आज कितवा स्वातंत्र्य दिन आणि कितवा अमृत महोत्सव आहे..?
सोशल मीडिया म्हणू नका, पाट्या म्हणू नका किंवा रस्त्यांवरील चौक म्हणू नका. सर्वत्र शूरवीरांच्या बलिदानाला वंदन करत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होताना दिसत आहे. काही ठिकाणी देशाच्या (76 Independence Day) ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, तर काही ठिकाणी ७६ वा स्वातंत्र्य दिन म्हणूनही उल्लेख केला जात आहे. तर काहीजण ७५ वा अमृत महोत्सव असा उल्लेख करत आहेत.
तुमचाही गोंधळ होतोय का?
(British Rule) ब्रिटीश राजवटीच्या तावडीतून भारतानं मोकळा श्वास घेतला आणि पहिला स्वातंत्र्य दिन साजरा झाला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी. म्हणजेच 15 ऑगस्ट 1948 ला देशाच्या स्वातंत्र दिवसाला एक वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला होता. त्यावेळी स्वातंत्र्य दिनाचं दुसरं वर्ष असलं तरीही त्याची वर्षपूर्ती होती.
जेव्हा स्वातंत्र्य दिन असा उल्लेख केला जातो तेव्हा त्या मूळ दिवसाची तारीखही गणली जाते. अशाच प्रकारे 1957 ला देशाच्या स्वातंत्र्याची दशकपूर्ती साजरा करण्यात आली. पण, तो देशाचा 11 वा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा झाला.
अगदी त्याचप्रकारे 2022 मध्ये, म्हणजेच यंदाच्या वर्षी आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आणि हा देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे तुम्ही कुठे 76 वा स्वातंत्र्य दिन असा उल्लेख पाहिला किंवा ऐकला तर तो चुकीचा आहे, असं समजू नका.
पहिला स्वातंत्र्य दिन : १५ ऑगस्ट १९४७
दुसरा स्वातंत्र्य दिन : १५ ऑगस्ट १९४८
दहावा स्वातंत्र्य दिन : १५ ऑगस्ट १९५६
अकरावा स्वातंत्र्य दिन : १५ ऑगस्ट १९५७
सत्तरावा स्वातंत्र्य दिन : १५ ऑगस्ट २०१६
७६ वा स्वातंत्र्य दिन : १५ ऑगस्ट २०२२
तसेच स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव नसून पहिलाच अमृत महोत्सव आहे..
:: वर्ष - महोत्सव ::
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
🇮🇳🇮🇳 जय भारत 🇮🇳🇮🇳

.jpeg)

No comments:
Post a Comment